AKBAR OF HINDUSTAN by PARVATI SHARMA
AKBAR OF HINDUSTAN by PARVATI SHARMA
अकबर द ग्रेट ही व्यक्ती बहुतेक भारतीयांच्या परिचयाची आहे. एक उत्तम योद्धा, एक महान प्रशासक आणि अनेकतत्त्ववाद व सहिष्णुता यांबद्दलच्या ज्याच्या कल्पना विविध धर्माच्या लोकांनी युक्त असलेला भारत एकत्र आणण्याचा प्रयत्न करत राहिल्या असा एक दूरदृष्टीचा शासक, अशा प्रकारे नावाजला गेलेला अकबर राष्ट्रीय पातळीवरची एक चढत्या क्रमाने उलटसुलट चर्चा होण्याचा विषयही आहे. आणि तो परिचित जरी असला, तरी अकबर आपल्याच दंतकथेमध्ये अडकून पडलेले एक गूढदेखील आहे: प्रशंसनीय, पण समजायला कठीण. एक लहान मुलगा, एक पिता, एक मित्र, एक शत्रू म्हणून अकबर खरोखर कसा होता? त्याचा राग, त्याचे दु:ख, त्याच्या अत्यंत आवडीच्या गोष्टी आणि त्याचे हसणे, या त्याच्या मनोवस्था कशा होत्या? तेरा वर्षांचा, पितृछत्र हरपलेला आणि महत्त्वाकांक्षी सल्लागारांच्या आणि सरदारांच्या गराड्यामध्ये सापडलेला एक मुलगा जगातला सर्वांत बलिष्ठ राजा कसा झाला आणि त्याच्या या चक्रावून सोडणार्या प्रगतीला त्याने कसे तोंड दिले? अकबर एक संशयात्मा होता का, की आपल्यामध्ये दैवी, चमत्कारी शक्ती आहे असे त्याला वाटत होते? अकबराचे व्यामिश्र आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवणारे हे चरित्र राजेपदासंबंधीच्या अकबराच्या कल्पना आणि आदर्श त्याच्या राज्यकाळात कसे उत्क्रांत होत गेले, त्याने राजकीय आणि धार्मिक अधिकार आपल्यामध्ये कसे एकवटले, तो स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजत असल्याचे प्रसंग, त्याच्या शंका आणि त्याची न्यायासाठीची तडफड या सगळ्यांची देखील कथा आहे. तपशीलांची रेलचेल आणि अविस्मरणीय पात्रांचा संच यांनी युक्त असलेल्या या चरित्रामध्ये हास्य आणि आत्यंतिक नाट्यदेखील आहे आणि तो ज्या जगामध्ये जगला त्याचे एक सुस्पष्ट चित्र हे पुस्तक उभे करते. सखोल संशोधनाअंती आणि सुंदररित्या लिहिले गेलेले पार्वती शर्मांचे अकबर द ग्रेटचे व्यक्तिचित्र अभूतपूर्व रितीने एक अपरिपूर्ण आणि विलक्षण मनुष्य जिवंत करते. या मनुष्याने जवळजवळ पन्नास वर्षे राज्य केले आणि भारतीय जनमानसामध्ये जवळपास अर्धे सहस्रक तो जगला आहे."