Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Ajinkya Yoddha Thorle Bajirao By Jayraj Salgaokar

Regular price Rs. 359.00
Regular price Rs. 399.00 Sale price Rs. 359.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Ajinkya Yoddha Thorle Bajirao By Jayraj Salgaokar

जगाचा इतिहास हा जेत्यांचा इतिहास आहे. जेते होण्यासाठी शस्त्र-सामर्थ्य, शस्त्रांची अचूक विध्वंसकता, सैन्याची चपळता आणि निसर्गाचे भान या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

अलेक्झांडर दि ग्रेट, चेंगीझ खान, ज्युलियस सीझर, जनरल पॅटन, मियामोटो मुसाशी अशा जगातील गाजलेल्या अजिंक्य योद्ध्यांच्या पंक्तीत आपल्या अचाट पराक्रमाने शत्रूला नामोहरम करणारे थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव घेणे सयुक्तिक ठरेल. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात बाजीराव ४१ लहान-मोठी युद्धे लढले आणि ती सगळी जिंकले.

असे असूनही थोरले बाजीराव म्हटले की, लोकांना बाजीराव-मस्तानी असे एक आंतरधर्मीय प्रेमप्रकरणच दिसते. बाजीरावांच्या आयुष्यात मस्तानी खूप उशिरा आली. मस्तानीचे वडील छत्रसाल यांचे मराठ्यांशी मैत्रीचे संबंध शिवाजी महाराजांपासून होते. मस्तानीबरोबर बाजीरावांचा सहवास केवळ सतरा महिन्यांइतकाच मर्यादित होता, याचे भान कोणी ठेवताना दिसत नाही, ही खेदाची गोष्ट आहे.

बाजीरावांसारखा लढवय्या, शूर आणि स्वाभिमानी आदर्श पुढील पिढ्यांना खूप स्फूर्तिदायक ठरू शकतो, याचा विचार करून थोरल्या बाजीरावांचे कार्यचरित्र या पुस्तकात वर्णिले आहे.