Skip to product information
1 of 2

Payal Books

Aisa Dnyansagaru : Bakhar Mumbai Vidyapeethachi ऐसा ज्ञानसागरु बखर मुंबई विद्यापीठाची Aroon Tikekar अरुण टिकेकर

Regular price Rs. 600.00
Regular price Rs. 675.00 Sale price Rs. 600.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

दीडशे वर्षापूर्वी कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथील विद्यापीठे स्थापन झाली. त्यापूर्वी मुंबई ही देशाची अनभिषिक्त आर्थिक राजधानी झाली होती. मुंबई हे शहर जगाची पूर्वेकडील व्यापारपेठ होती. उद्यमामुळे झालेली आर्थिक प्रगती आणि नामवंत गुरुशिष्यांच्या जोड्यांनी केलेली वैचारिक प्रगती यांच्या सहयोगातून मुंबईत सुधारणा पर्वास प्रारंभ झाला. हाच तो बहुचर्चित प्रबोधन-काळ १८५७ मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना होणे, आणि सर बार्टल फ्रिअरसारख्या धाडसी गव्हर्नरने किल्ल्याची तटबंदी तोडण्याचा १८६० साली निर्णय घेणे हे मुंबई शहराच्या वाढीसाठी उपयुक्त ठरलेले दोन महत्त्वाचे निर्णय. यापुढील विद्यापीठाची आणि शहराची वाढ समांतरच होणार होती. ती कशी झाली, त्यामुळे समाजाचे प्रबोधन होऊन मुंबईने देशस्तरावर सर्वच क्षेत्रांचे नेतृत्व कसे मिळवले… हा सारा रोमहर्षक इतिहास या पानांवर ग्रथित आहे. मुंबईसंबंधी प्रकरण, नंतर विद्यापीठाच्या विकासाच्या आलेखाची काही प्रकरणे असा आकृतिबंध लेखकाने स्वीकारल्याने १९व्या शतकातील शैक्षणिक आणि अन्य घडामोडी आपल्यासमोर घडत आहेत असा आभास होतो, इतका वाचक गुंगून जातो. वाचनीयता हा या इतिहास-लेखनाचा विशेष मानावा लागेल. किंबहुना पक्के संशोधन वाचनीय असू शकत नाही, या गैरसमजाला या ग्रंथाने पुन्हा एकवार छेद दिला आहे.