Skip to product information
1 of 2

Payal Books

Adnyat Panipat – अज्ञात पानिपत by Manoj Dani

Regular price Rs. 1,150.00
Regular price Rs. 1,300.00 Sale price Rs. 1,150.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications
मराठे आणि गिलचे यांमधील पानिपतच्या तिसऱ्या युद्धाबद्दलची नवीन आणि आजवर अज्ञात अशी माहिती देणे हा पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. पुस्तकाची पहिली ३५० पाने केवळ या उद्दिष्टाला वाहिलेली आहेत. यात केवळ पानिपत-युद्धाचा इतिहासच नाही तर युद्धशास्त्र, भूगोल, खगोलशास्त्र, पुरातत्वशास्त्र, नकाशे इत्यादी वापरून इतिहासाचे विश्लेषणही केलेले आहे. अफगाण बाजूकडील आणि इराणमधील इतिहास मागील वीस वर्षात नवीन प्रसिद्ध झालेला आहे. त्या इतिहासात मराठ्यांच्या इतिहासाला दुजोरा देणारे आणि मराठ्यांच्या पानिपत-गाथेतील काही गूढांवर प्रकाश टाकला आहे.  पुस्तकाच्या पुढील पानांमध्ये पानिपत-युद्धाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अश्या अप्रकाशित हस्तलिखितांच्या मूळ प्रती आणि लिप्यंतर मराठी अनुवादासह दिलेले आहेत. १. *काशीराजाची बखर* -पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार काशीराज शिवदेव हा अवधचा नवाब शुजाउद्दौला याच्या हुजुरात होता. युद्धाच्या शेवटी घडलेल्या घडामोडी आणि नंतरच्या दिवसातील रणभूमीवरील हकीगत काशीराजा सांगतो.  २. *अहमदशहाचा इतिहास* : महमूद अल हुसैनी- अहमदशाह अब्दालीने आपल्या दरबारामध्ये एक अधिकृत इतिहासकार नेमला होता. ३. *पानिपतचा अहवाल* : लेखनिक बक्षुल्ला-या हकीगतीचा मूळ लेखक तरुण वयात शुजाच्या नोकरीत असून पानिपत रणभूमीवर प्रत्यक्ष हजार होता. हा मजकूर कोणा पाश्चात्य आश्रयदात्यासाठी लिहिलेला आहे, कारण येथे सर्व भौगोलिक संकल्पना मुळातून फार्सीतच समजावून सांगितल्या आहेत. शत्रू मोठा दाखविला की, आपला विजयसुद्धा मोठा होतो हे लेखकानेच या हकीगतीत सांगितले आहे. ४.*इब्रतनामा* : इब्राहीम अली खान-इंग्लंडचे राजे (सुलतान-ए इंग्लिस्तान) यांचे भारतातील गव्हर्नर जनरल (सिपाहसालार) लॉर्ड कॉर्नवॉलिस यांच्यासाठी पूर्वीचा मोगल राज्यातील, पण आत्ता इंग्रजांचा अधिकारी अलीइब्राहिमखान याने मराठ्यांचा एक इतिहास (अहवाल) लिहून १७८६ साली तो कलकत्त्याला पाठविला. ५. *पानिपतचा पश्तो पोवाडा* – पश्तो शाहनाम्याला मराठीत अहमदशहाचा पोवाडा असे सर्वाना समजेल असे शीर्षक दिले आहे. हा शाहनामा म्हणजे अहमदशहा अब्दालीच्या आयुष्यावर रचलेले पश्तो भाषेतील एक महाकाव्य आहे. कवीने ते काव्य रचताना अहमदशहाच्या राज्यारोहणापासून ते १७६२ सालच्या घटनांचा वापर केलेला आहे.
अश्या अनेक गूढांचा अस्सल आणि नवीन साधनांमधून, नकाशांतून आणि चित्रांद्वारा उलगडा करणारे एकमेव पुस्तक!
मनोज दाणी लिखित अज्ञात पानिपत!