Adnyaat Anamikanche Kartutva By Dr. Bal Phondke Translated By Vaishali Joshi
Regular price
Rs. 86.00
Regular price
Rs. 95.00
Sale price
Rs. 86.00
Unit price
per
भारतामध्ये विज्ञानाच्या आघाडीवरील आक्रमण ही दुर्दैवाने सर्वसामान्यपणे समजली जात असल्याप्रमाणे, अलीकडच्या काळात घडलेली घटना नाही. गतकाळातही, विज्ञानाचा पाठपुरावा करण्यासाठी मिळणारा उदार पाठिंबा ही सरकार आणि समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट होण्यापूर्वी देखील, पुष्कळ भारतीय विद्वानांनी मानवजातीच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यापैकी काहीजणांना योग्य ते मानसन्मान मिळाले, काहींना हारतुरेही मिळाले. रामन, बोस, साहा, भाभा, भटनागर ही नावे घराघरांतून परिचित झाली. परंतु अशा प्रत्येक तेजस्वी व्यक्तीमागे शांतपणे काम करणार्या दहा व्यक्ती असतात. कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवता, अंधारातच ही माणसे अथक परिश्रम करीत असतात. स्वत:च्या समाधानासाठी भरपूर यश मिळवणार्या या स्त्री-पुरुषांच्या कामगिरीवरच भारतीय विज्ञानाचा विशाल इमला आज उभा आहे. प्रशंसा आणि प्रोत्साहनाचा अभाव असतानादेखील केवळ स्वत:च्या उत्साहाच्या बळावर त्यांनी विज्ञानाची कार्यवाही केली आणि दूरवर प्रचार केला. आयुष्यामध्ये स्तुतिहीन राहिलेल्या आणि मृत्यूनंतर विस्मृतीत गेलेल्या या लोकांनी विज्ञानाची आघाडी पुढे रेटण्यासाठी उपयोगी ठरणारा वारसा मागे ठेवला आहे. त्यांच्या चरित्रांचा हा संठाह म्हणजे उशिरा केलेला असला, तरी या विस्मृतीत गेलेल्या भारतीय शास्त्रज्ञांना केलेला मानाचा मुजराच आहे.