Skip to product information
1 of 2

Payal Books

Adhunik Bhartache Shilpakar | आधुनिक भारताचे शिल्पकार by AUTHOR :- Baba Bhand

Regular price Rs. 20.00
Regular price Rs. 25.00 Sale price Rs. 20.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications
आधुनिक भारताच्या जडणघडणीचे एक शिल्पकार आहेत महाराजा सयाजीराव गायकवाड. राज्य चालविणे हे शास्त्र आहे. त्यासाठी राजा ज्ञानी असावा हे ओळखून सयाजीराव स्वतः शिकले. जगभरातील प्रशासन पद्धतीचा अभ्यास केला. सुप्रशासन अन् जनतेच्या ज्ञानात्म प्रबोधनातूनच जनकल्याणाचा ध्यास घेतला.  शिक्षण-विज्ञान हेच प्रगती-परिवर्तनाचे साधन आहे. हे ओळखून देशात प्रथमच सक्तीचे प्राथमिक मोफत शिक्षण, सुप्रशासन-न्याय, शेतीउद्योगांना मदत, सामाजिक-धार्मिक सुधारणा, जाती-धर्मातील पंगतिभेद दूर करून समता, मानवता अन् सर्वधर्म समभावाचा मार्ग निवडला.
शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अन् वाङ्मयीन कलांचे ते आश्रयदाते होते. देशभरातील अनेक युगपुरुष-संस्थांना त्यांनी मदत केली. पितामह नौरोजी, जमशेटजी टाटा, नामदार गोखले, लो. टिळक, म. गांधी, न्या. रानडे, म. फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर, पं. मालवीय, कर्मवीर भाऊराव, स्वा. सावरकर, महर्षी शिंदे हे यातील काही आहेत. अनेक संस्था-व्यक्तींना महाराजांनी केलेली कोट्यवधींची मदत हे जगावेगळे त्यांचे दातृत्व होते.
महाराजा सयाजीराव हे स्वातंत्र्ययोद्ध्यांचे पाठीराखे आणि एक प्रज्ञावंत लेखक ही त्यांची नवी ओळख आहे. त्यांची पुस्तके, भाषणे, पत्रे, हुकूम आणि रोजनिशी हा देशाचा अनमोल वारसा आहे. सुप्रशासन आणि जनकल्याणातच मोक्ष शोधणाऱ्या सयाजीरावांचे बलसंपन्न भारताचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्याचे काम प्रत्येक भारतीयास पूर्ण करावयाचे आहे.