Aawa | आवा Author: Vasudha Sahasrabuddhe |वसुधा सहस्रबुद्धे
चित्राजींची अलीकडेच प्रसिद्ध झालेली कादंबरी ‘आवां’ ही हिंदीतील अक्षर कलाकृतींपैकी एक गृहीत धरली जाते. याच कादंबरीने त्यांना जागतिक कीर्तीचे मानसन्मान
मिळवून दिले. आवा म्हणजे कुंभाराची भट्टी. मातीची भांडी- ज्यापैकी काही भांडी चांगल्या कलाकृती ठरतात- या भट्टीत भाजून पक्की केली जातात. या भट्टीचा प्रतिमा
म्हणून वापर करून लेखिकेने त्या काळातील कारखान्यातील कामगारांच्या आणि स्त्रियांच्या संघर्षाचे चित्रण अतिशय तीव्र संवेदनशीलतेने केले आहे.
सुप्रसिद्ध कामगार नेते दत्ता सामंत यांच्या काळात कामगार चळवळीबरोबर असणार्या लेखिकेच्या दीर्घ आणि अतिशय प्रबळ अशा संबंधांचे ही कादंबरी प्रतिनिधित्वच करते.
यापूर्वी ट्रेड युनियन प्रस्थापित यंत्रणेशी लढण्यासाठी बनविली होती. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत पाहता तिचं रूप इतकं विकृत व भ्रष्ट झालं आहे की ती जणू समांतर सरकारच बनली आहे.
प्रस्तुत कादंबरीत लेखिकेने आजच्या चंगळवादी समाजाचे अनेक स्तरावर कठोरपणे संशोधन करून त्याचे तळापर्यंतचे चित्र अधिक स्पष्ट केले आहे.
अर्थात ही एक अभिजात कलाकृती आहे. तो केवळ ट्रेड युनियनचा इतिहास नाही. लेखिकेने तो कामगारांच्या थकलेल्या चेहर्यावरील विदीर्ण रेषांमधून लिहिला आहे.