तुम्ही पुढील गोष्टी कशा करू शकता ते शोधा :
• आंतरिक शक्तीचे निर्माण
• अस्वीकृतीला तोंड देणे आपला एकमेवाद्वितीयपणा विकसित करणे
• आपल्या प्रतिभेचा विस्तार
• आरोग्याशी मैत्री
• सर्वोत्तम बनण्याची संधी मिळवणे
• प्रेमपूर्ण संबंध विकसित करणे
• आत्मविश्वास मिळवण्यासाठी इतरांना मदत करणे.
ही आणि इतर व्यवहार्य मार्गदर्शक तत्त्वे अद्भुत गोष्टी व रंजक प्रसंगांचे दाखले देऊन तुम्हाला हे सांगतील की, आत्मपूजनाच्या सापळ्यात न अडकता आपला आत्मविश्वास कसा वाढवावा. हे पुस्तक तुमचे खरेखुरे स्वत्व शोधण्यात तुमची मदत करेल.
अॅलन लॉय मॅस(१९३३-२००५) हे एक उत्कृष्ट कौटुंबिक समस्या उपचारक, व्यवसाय मार्गदर्शक, सर्वाधिक खपाच्या पुस्तकांचे लेखक व लोकप्रिय वक्ते होते. मंत्री म्हणून वीस वर्षे काम केल्यानंतर ते सल्लागार बनले आणि त्यांनी ग्लॅनडेल, कॅलिफोर्निया येथे व्हॅली काउन्सलिंग सेंटरची सहस्थापना केली. १९७० मध्ये त्यांनी ‘मित्रत्व’ या विषयावर संशोधन केले व त्यांचे ‘द फ्रेण्डशिप फॅक्टर’ हे पुस्तक १९७९ मध्ये ऑक्सबर्ग फोर्टरेस यांच्याकडून प्रकाशित झाले. ज्याची २००४ मध्ये नवीन आवृत्ती निघाली. एक लोकप्रिय वक्ता असलेल्या या लेखकाने पन्नासहून अधिक लेख लिहिले व इतर पुस्तकेही लिहिली, ज्यात ‘ऑक्सबर्ग बुक्स’ने प्रकाशित केलेल्या ब्रिगिंग आउट द बेस्ट इन पीपल’ व ‘द बॅलेन्स्ड लाइफ’ या पुस्तकांचा समावेश आहे.