{"product_id":"aanibaniche-nayak-aani-khalnayak-shrimant-mane-आणीबाणीचे-नायक-आणि-खलनायक-श्रीमंत-माने","title":"Aanibaniche Nayak Aani Khalnayak  Shrimant Mane  आणीबाणीचे नायक आणि खलनायक श्रीमंत माने","description":"\u003cp\u003eAanibaniche Nayak Aani Khalnayak  Shrimant Mane  आणीबाणीचे नायक आणि खलनायक श्रीमंत माने\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eइंदिरा गांधी आणि जयप्रकाश नारायण या आणीबाणीतील दोन प्रमुख नेत्यांचे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eचरित्र, चारित्र्य, स्वभाव, जवळीक, दुरावा आणि महत्त्वाकांक्षांचे द्वंद्व या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसाऱ्यांची ही विस्तृत कहाणी आहे. सत्ता आणि महात्म्य यातील चढाओढीची ही \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअभूतपूर्व गाथा आहे. व्यक्तिगत संबंधातला संशयास्पद गोडवा आणि राजकारणातील \u003c\/span\u003e\u003cspan\u003eटोकाचा दुरावा यांची ही गोष्ट आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआणीबाणीचे समर्थन कुणी करणार नाही. मात्र ती लावली जाण्यामागची कारणे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमहत्त्वाची आहेत. राजकीय भ्रष्टाचार आणि बांगला विजयामुळे इंदिरा गांधींना \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमिळालेली राष्ट्रीय व जागतिक मान्यता आणि त्यावर उफाळलेला त्यांच्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eस्वपक्षीय नेत्यांचा रोष या गोष्टी येथे लक्षात घ्याव्या अशा आहेत. महागाई व \u003c\/span\u003e\u003cspan\u003eबेरोजगारीचे संकट, बँकांच्या राष्ट्रीयीकरणाने संतापलेले देशभरचे भांडवलदार \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआणि म्हातारपणाकडे झुकलेल्या काँग्रेसमधील पुढाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eगोष्टीही यात महत्त्वाच्या ठराव्यात. 'आणीबाणी हा नाइलाज आहे' हे स्वतः \u003c\/span\u003e\u003cspan\u003eइंदिरा गांधींनीच म्हटले आणि 'सरकारविरोधी आंदोलन करण्यात आपली चूक \u003c\/span\u003e\u003cspan\u003eझाली' ही जयप्रकाशांनी विनोबांजवळ दिलेली कबुली साऱ्या घटनांवर वेगळा \u003c\/span\u003e\u003cspan\u003eप्रकाश टाकणारी आहे. त्याच वेळी संघाचे सरसंघचालक देवरस यांनी इंदिरा \u003c\/span\u003e\u003cspan\u003eगांधींना दोन पत्रे लिहून मागितलेली माफी; एकनाथ रानडे, दत्तोपंत ठेंगडी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआणि भाऊराव देवरस यांनी संजय गांधींजवळ लिहून दिलेले 'शरणपत्र' \u003c\/span\u003e\u003cspan\u003e(डॉक्युमेंट ऑफ सरेंडर) हेही यातच पाहावे असे आहे. मी स्वतः आणीबाणीत  \u003c\/span\u003e\u003cspan\u003e१४ महिने तुरुंगात होतो आणि बाजपेयींसारखा विरोधी नेता दीर्घ काळपर्यंत \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपॅरोलवर कसा राहिला, ही गोष्ट तेव्हाही आम्हा राजबंद्यांना कळली होती! \u003c\/span\u003e\u003cspan\u003eया साऱ्या प्रश्नांमागे असलेली या दोन नेत्यांच्या मानसिकतेची आरंभापासूनची \u003c\/span\u003e\u003cspan\u003eघडण, त्यांनी अनुभवलेल्या राजकीय आपदा व त्यासोबतच मिळवलेली अमाप \u003c\/span\u003e\u003cspan\u003eलोकप्रियताही श्रीमंत माने यांनी प्रदीर्घ स्वरूपात लिहिली आहे. विसाव्या शतकाचा \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसंक्षिप्त राजकीय इतिहास ठरावा, असे हे लिखाण आहे. त्यातल्या प्रत्येक विधानाची \u003c\/span\u003e\u003cspan\u003eप्रमाणे त्यासोबत आहेत. त्यामुळे ती विश्वसनीय ठरणारीही आहेत. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eतात्पर्य, आणीबाणीबाबत प्रकाशित व अप्रकाशित, जाहिरात केलेल्या व दडवलेल्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसगळ्या घटनांचा यातील तपशील वाचकांना अभ्यासनीय वाटावा व या घटनाक्रमांकडे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपाहण्याची वेगळी दृष्टी देणारा आहे. महाराष्ट्र या दोन दर्शनांचे सत्याग्रहासारखेच \u003c\/span\u003e\u003cspan\u003eस्वागत करील याविषयीचा माझा विश्वास वाचक खरा ठरवतील ही अपेक्षा आणि \u003c\/span\u003e\u003cspan\u003eश्रीमंत माने यांच्या अभ्यासू वृत्तीचे अभिनंदन!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eप्रा. सुरेश द्वादशीवार\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50066877644993,"sku":null,"price":520.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Aanibaniche_Nayak_Aani_Khalnayak_Shrimant_Mane.jpg?v=1774165008","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/aanibaniche-nayak-aani-khalnayak-shrimant-mane-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%96%e0%a4%b2%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}