Skip to product information
1 of 2

Payal Books

Aanandghan | आनंदघन by AUTHOR :- Baba Bhand

Regular price Rs. 132.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 132.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications
आनंदधन ही पर्यावरणीय जीवनदृष्टी ठेवून आयुष्य रचण्याची कहाणी आहे. समतल जागा शोधणं हा पाण्याचा धर्म, तर समपातळीचा दांड करून नदीनाल्याचं पाणी शेतीसाठी वापरणं हा शेतकऱ्याचा जीवनधर्म, चढातील दमछाक कमी करण्यासाठी एकांतात मनाची बांधणी करणं आणि मौनाळल्या मनाला निसर्गलिपीतून आकारित होऊ देणं हा कलावंताचा सौंदर्यधर्म. तुंबलेलं बाष्प गार वाऱ्याच्या स्पर्शाबरोबर पाझरू लागावं तसं सृष्टीच्या सान्निध्यात लेखकाचं मन शब्दांशी झिम्मा खेळू लागते. ‘आनंदघन’ ही अशी सृष्टीच्या सान्निध्यात सहजपणे पाझरलेली नितळ मनोगते आहेत. कथा, कादंबरी, निबंध अशा कुठल्याच चौकटबद्ध नामरूपात न अडकणारी, आहे तसं स्वीकारीत जाणारी, जमेल तसं रचत जाणारी, काळोखाला चांदण्यांचे डोळे फुटावेत इतक्या सहजपणे शब्दबद्ध होणारी ही सर्जनाची आनंदरूपे आहेत. कच्च्या मुरमाप्रमाणे मनुष्यस्वभावाची मुरमाड बाजू हेरता येणारं आणि गाळपेराची जमीन पाहिल्यावर हरखून जावं तसं सृजनशील माणसं भेटल्यावर आनंदून जाणार हे मन आहे. निसर्गरूपाप्रमाणे मनुष्यस्वभावाचे काठ कंगोरे, त्यांच्या स्वभावाचा पोत आणि तळ न्याहाळण्यात ते रमून जातं. नव्या व्यवस्था निर्माण करून स्वत:ला रचत जाणं ही मनुष्यस्वभावाची रचनात्मक बाजू या मनोगतातून पुढे येते. चुनखडीवर कन्हेर चांगला येतो, कमी पाण्यावर बोगनवेलीचं कुंपण घालता येतं, तसं भरड माणसांच्या सोबतीनं ‘आनंदघन ही कसं होता येतं हे सांगणारी ही मनोगतं एका अर्थाने । जीवनाची मातृकासूक्तंच आहेत.