मुलं आणि मोठ्यांसाठीची गोष्ट
ही आहे शरीर आणि मनाच्या संस्काराची गोष्ट.
माणूस आणि निसर्गाचं एक अतूट नातं आहे.
जे जग आणि त्यातील सगळे नियंत्याने निर्मिले.
निर्मिकाच्या निसर्गचक्राने ऊन, पाऊस, बर्फ अन् थंडी पडते.
भूतलावरील माणूस, किडे-मुंग्यांसारखे कीटक, पक्षी – प्राणी आणि
झाडा-झुडपांसाठी निसर्गाने नियम केले आहेत.
नियम पाळणे हा निसर्गाचा धर्म आहे.
नियम मोडले की तो शिक्षा करतो. आपणही जगताना, वागताना, खाताना
नियम मोडला की शिक्षा होणारच; पण बरेचदा ती दृश्य स्परूपात नसते.
असते मात्र हमखास.
यातून शरीर मनाच्या बिघाडाची सुरूवात होते.
चांगले संस्कार शरीर-मनास निरोगी राहण्यास मदतच करतात.
मात्र प्रत्येक गोष्टीची सुरूवात स्वत:पासूनच करायची असते.
आज जगभर आवर्षणाचं, अतिवृष्टीचं आणि पर्यावरण असंतुलनाचं संकट
घोंघावत आहे. जाती-धर्माच्या नावानं दहशतवादाचं भूत भेडसावत आहे.
अतिलोभानं धनदांडग्यांची शक्ती दुर्बलानं चिरडून टाकत आहे आणि
आम्ही आमच्या स्वार्थासाठी निसर्गाची सगळी घडी बिघडवून टाकली आहे.
या गोष्टीला मी मीच जबाबदार आहे. ही स्थिती आपण जोपर्यंत स्वीकारत नाही,
तोपर्यंत या जबाबदारीच्या जाणिवेचा स्पर्श होत नाही.
म्हणून प्रत्येक गोष्टीची सुरूवात माझ्यापासूनच होऊ शकते.
मग ती चांगली असू दे, नाही तर चांगली नसू दे.
एवढं जरी केलं तर अनेक प्रश्न सोपे वाटू लागतील.
अशी आहे ही आनंदाश्रमाची गोष्ट.