Aai आई by Maxim Gorky मॅक्सिम गॉर्की अनुवाद : प्रभाकर उर्ध्वरेषे
Aai आई by Maxim Gorky मॅक्सिम गॉर्की अनुवाद : प्रभाकर उर्ध्वरेषे
प्रत्येक देशाच्या इतिहासात त्या देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारे प्रसंग घडून येतात; आणि त्या प्रसंगांना अनुरूप अशी पुस्तकेही त्या देशाच्या वाडमयात आढळून येतात. गोर्कीची ‘आई’ ही कादंबरी, आम्हा रशियनांच्या दृष्टीने अशा पुस्तकांत मोडते.
‘आई’ ही कादंबरी इ. स. १९०७ साली रशियात प्रसिद्ध झाली; त्या वेळी गोर्कीचे वय सुमारे चाळीस वर्षांचे होते. वाङमयीन आणि सार्वजनिक कार्याची पंधरा वर्षांची आराधना त्यांच्या पाठीशी उभी होती. इ. स. १८९८ साली त्यांचा पहिला कथासंग्रह ‘निबंध आणि लघुकथा’ या नावाने प्रसिद्ध झाला आणि वाचकांचे त्याला अमाप यश मिळाले. ‘फोमा गोर्देयेव’ ही त्यांची कादंबरी त्यानंतर वर्षानेच प्रसिद्ध झाली. त्याच सुमारास तोलस्तोय यांची ‘ पुनरुत्थान ‘ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. ‘पुन- रुत्थान ने रसिकांना जेवढे वेड लावले जवळजवळ तेवढेच वेड ‘फोमा गोदेयेव’ नेही लावले. त्यानंतर त्यांची ‘तिथे ‘ ही कादंबरी बाहेर पडली; काही नाटकेही प्रसिद्ध झाली आणि लवकरच त्यांच्या कीर्तीचा सुगंध स्वदेशाच्या सीमा ओलांडून सान्या जगभर दरवळू लागला.
त्यांच्या या सुरुवातीच्या लेखनात वास्तववादी सत्यप्रियता आहे; त्यांचे स्वतःचे जीवन अतिशय कष्टमय गेले होते आणि तरीही त्यांच्या या लेखनात विस्मयजनक वाटणारा उत्साहवर्धक सूर आहे ‘शूरांच्या वेडेपणा ‘वर त्यांनी चढविलेला गौरवाचा साजशृगांर आहे. म्हणजेच या लेखनात भविष्यकाळातील त्यांच्या महान कलाविलासची सर्व बीजे आढळून येतात.