Aagal Vegal आगळं वेगळं by S G MALASHE सं. ग. मालशे
Aagal Vegal आगळं वेगळं by S G MALASHE सं. ग. मालशे
प्रा. स. गं. मालशे हे मागच्या पिढीतले जाणकार व्यक्तिमत्व होते. ते लेखक, समीक्षक, उत्तम वाचक आणि ग्रंथसंग्राहक होते. त्यांना दुर्मिळ पुस्तकं आणि त्यासोबत नानाविध विचित्र गोष्टी जमावण्याचा छंद होता. या सगळ्या शोधण्यात – जमावण्यात त्यांना अनेक गोष्टी, चिजा, माणसं सापडत गेली, भेटत गेली. या सगळ्या प्रवासतल्या निवडक अनुभव, पुस्तक आणि छंदाविषयीच्या लेखांचा संग्रह म्हणजे ‘आगळं-वेगळं’ हे पुस्तक होय. या पुस्तकात 14 लेख आणि 1 सूची अशी एकूण 15 प्रकरणं आहेत. या प्रकरणात आपल्याला काहीही सापडू शकतं. उदाहरण द्यायचं झाल्यास पुण्यतले मागच्या पिढीतले सुप्रसिद्ध वकील जोग यांचं अतिशय तऱ्हेवाईक प्रकरतलं ‘मी हा असा भांडतो’ या पुस्तकावर एक विस्तृत लेख आपल्याला वाचायला मिळतो. अजून एक उदाहरण द्यायचं झाल्यास अच्युत बळवंत कोल्हटकर यांच्या ‘चोरी कशी करावी’ या पुस्तकावर देखील टिपण इथे सापडते. एक चौकस वाचक एखाद्या पुस्तकांवरच्या पुस्तकात नेमकं के शोधत असेल ते ते सगळं या पुस्तकात वाचकाला नक्की सापडतं.