Skip to product information
1 of 2

Payal Books

Aadbandarcha Rudrakot  By Dr. Avinash Sowani

Regular price Rs. 460.00
Regular price Rs. 525.00 Sale price Rs. 460.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
PUBLICATINS

संशोधक कितीही ताकदीचा असो, त्याचेही काळापुढे काही चालत नाही, कारण काळाचा महिमा अगाध असतो.
तो काळच ठरवीत असतो की शोधणार्‍याच्या हाती कधी काय द्यायचे ते. म्हणून सतत सावध असणे फार महत्त्वाचे असते, गरजेचे असते, शोधत राहणे आवश्यक असते.
काय सांगावे, शोध संपला असे वाटल्यानंतरही हाती असे काही मिळून जाते की आजपर्यंतचा शोधाचा प्रवास फारच तोकडा होता, असे वाटायला लागते.
ती वेळ यावी लागते आणि त्या वेळी दुर्लक्ष करून चालत नसते. वेळ साधावी लागते, नाहीतर संधी हातची निघून जाते आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायला लागते.
आडबंदरचा रुद्रकोट या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना हीच आहे.
अमेरिकेत जन्मलेली, शिकलेली, वाढलेली, नुकतीच आर्किऑलॉजिस्ट झालेली एक मराठी मुलगी कोकणातील आजोळच्या ओढीने येते. मात्र इथेच रमते. तरीही स्वत:च्या प्रयत्नातून काहीतरी संशोधन करून दाखवायचे या इर्षेने आसपासच्या प्रदेशात शोध घ्यायला लागते.
तिला ना ऐतिहासिक मराठी भाषेचे ज्ञान, ना मोडी लिपीशी ओळख. तरीही कोणत्याही ऐतिहासिक अस्सल कागदपत्रांच्या मदतीविना, जे जे हाती लागेल ते स्वीकारून योग्य संधी शोधायला लागते आणि अनपेक्षित असे यश तिच्या पदरात पडते.
अस्सल कागदपत्रांविनाही इतिहास संशोधन होऊ शकते या शक्यतेचा विचार करायला लावणारी ही एक कहाणी लिहिली आहे डॉ. अविनाश सोवनी यांनी.