A Note From Ichiyo By Rei Kimura Translated By Sunita Katti
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
per
अठराशे सत्तावन्ननंतरचा काळ. जपानचं रूढीवादी, पुरुषप्रधान मेजी युग. नत्सुको, एक सहा वर्षांची सुमार रूपाची बालिका. सामाजिक प्रतिष्ठेच्या पाय-या भरभर चढत जाऊन अत्युच्च पायरीवर- सामुराई पदावर पोहोचण्याच्या तीव्र महत्त्वाकांक्षेनं पछाडलेल्या नोरीयोशी हिगुचीची मधली मुलगी. सामाजिक परंपरेनुसार अत्यंत दुय्यम स्थान असलेली; पण तीव्र बुद्धी व साहित्यिक जाण यामुळे आपल्या महत्त्वाकांक्षी, साहित्यप्रेमी पित्याचा ती जीव की प्राण होती. एके दिवशी अस्खलित काव्यवाचन करताना या चिमुरडीच्या मनावर त्या लिखित शब्दांनी गारूड केलं. शरीरात एका विलक्षण झपाटून टाकणा-या साहित्यप्रेमाचा, शक्तीचा संचार झाला. विद्वत्सभेत कौतुकाच्या वर्षावाखाली चिंब भिजणा-या नत्सुकोनं मनोमन निश्चय केला की, आपल्या पित्याच्या विद्वान साहित्यिक मित्रांप्रमाणे आपणही लेखिका व्हायचं. सभेतील टाळ्यांच्या कडकडाटानं नोरीयोशी अभिमानानं फुलून आला; पण लग्न, चूल, मूल आणि घर हेच स्त्रीचं आयुष्य मानणा-या समाजात आपल्या या वाचनवेड्या, साहित्यप्रेमी लेकीचं काय होईल, या विचारानं आई पुरुयाचं काळीज दडपलं गेलं. पुढील आयुष्यात नत्सुकोचं व तिच्या पित्याचं स्वप्न खरं झालं की, आईची काळजी...