Skip to product information
1 of 2

Payal Books

A-mrut Panthacha Yatri By Dinkar Joshi Translated By Sushma Karogal

Regular price Rs. 198.00
Regular price Rs. 220.00 Sale price Rs. 198.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
रवीन्द्रनाथ ठाकूर, विश्वकवी. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय. आपल्या राष्ट्रगीताचे रचनाकर्ते! हा आहे त्यांचा शब्दबद्ध केलेला जीवनप्रवास. भरलेल्या घरात लहानपणापासून एकटे पडलेले रवीन्द्र आपल्या कवितांमध्येच रमणारे, कवितांसाठी प्रेरणा देणाया भाभीराणींमुळे मिळालेली उभारी आणि त्यांच्या जाण्यामुळे परत निर्माण झालेली पोकळी, वडिलांच्या आज्ञेखातर पण मनाविरूद्ध बघितलेले जहागिरीचे काम, त्यातूूनच येत गेलेली आजूबाजूच्या समाजाची जाण त्यांना घडवत गेली. रवीन्द्रनाथांच्या संपूर्ण आयुष्यावरच मृत्युचे मोठे सावट राहिले आहे. एकामागून एक प्रियजनांचा चिरवियोग त्यांना अजूनच एकटे करत गेला. शांतिनिकेतन शाळा, तिच्यासाठी करावी लागणारी धडपड; वेगवेगळ्या कलांची आवड, त्या निमित्ताने देशोदेशीच्या लोकांशी भेटी. संपर्क, नोबेल पुरस्कार, त्यामुळे मिळणारे मानसन्मान अशा वाटांवर त्यांचे आयुष्य चालत राहिले. अमृत पंथाचा हा यात्री मात्र एकला चालो रे म्हणत चालत राहिला...