Skip to product information
1 of 2

Payal Books

26:11 Mumbaivaril Halla By Harinder Baweja Translated By Prof Mukund Natu

Regular price Rs. 266.00
Regular price Rs. 295.00 Sale price Rs. 266.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
कराचीहून सागर मार्गाने आलेले दहशतवादी, साठ तास देशाच्या आर्थिक राजधानीत रक्तरंजित थैमान घालतात; त्याची ही प्रत्यक्षदर्शी कहाणी. परदेशी पर्यटक, श्रीमंत मंडळी यांची गर्दी असलेल्या कुलाब्यातील लिओपोल्ड कॅफे, ते हॉटेल ताज आणि हॉटेल ट्रायडेंट–ओबेरॉय पर्यंतच्या मुक्त संचारात नरिमन हाऊस आणि सीएसटी येथेही त्यांनी बेबंद नरसंहार केला. हे सर्व वाचताना दु:ख आणि वैफल्याने मन विषण्ण होते. परंतु या भीतिदायक काळातही सामान्य मुंबईकरांनी दाखवलेले धैर्य आणि विविध सुरक्षा दलांतील अधिकारी आणि जवानांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठा यांनी मन उचंबळून येते. ‘ये है बम्बई मेरी जान...’ या जुन्या गाण्याची आठवण येते. धडाडीचे कार्यक्षम सर्वोच्च पोलिस अधिकारी ‘ज्युलिओ रिबेरो’ यांनी देशाच्या ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेची केलेली चिरफाड काळजी निर्माण करते. अर्थात ते यावर उपायही सुचवतात. पण ते अंमलात कसे येणार हा वेगळा प्रश्न आहे. ....असे हल्ले भारताला आणखी काही काळ तरी सोसावे लागणार आहेत, याची कारणमीमांसा ज्येष्ठ पत्रकार हरिंदर बावेजा यांनी केली आहे.