Skip to product information
1 of 2

Payal Books

वैचारिक घुसळण आनंद करंदीकर

Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 315.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

जो वाचक आनंद करंदीकर यांना प्रत्यक्ष ओळखत नाही किंवा ज्या वाचकांना त्यांचे लिखाण सोडून त्यांच्याविषयी अन्य माहिती नाही, अशा वाचकाने हे पुस्तक वाचून त्यांच्या वयाचा अंदाज करावा... लेखक तरुण आहे म्हणावं तर एवढा अनुभव, अभ्यास, प्रगल्भता आणि शहाणपण लहान वयात कसं येईल असं वाटेल. लेखक वृद्ध आहे असं म्हणावं तर लेखनातील दृष्टिकोन, भाषाशैली, विचार अगदी तरुण आहेत. शिवाय, अनुभवाच्या व अभ्यासाच्या आणि त्यातून आलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर लेखक 'कन्क्लुजन' काढून रिकामा झालेला नाही. त्याने आणखी अभ्यासाचा व नवीन शिकण्याचा प्रवास थांबवलाय असं वाटत नाही.

 

लेखक 'वादी' झालेला नाही, 'संवादी' राहिलेला आहे. विषय, मुद्दा, अभ्यास, दृष्टिकोन, मांडणी, तर्क, तात्पर्य या क्रमांनी पुस्तकातील सगळेच लेख सहज पुढे पुढे जातात. पण यामध्ये सोल्युशन आणि त्या सोल्युशनची अंमलबजावणी करण्याचा मार्ग यांना तुलनेने कमी जागा मिळाली आहे. मात्र त्यांनी हाताळलेले विषयच इतके गुंतागुंतीचे आहेत की, त्यावर ठळक वा ठोस सोल्युशन सांगता येणं कठीण आहे. परंतु वाचकाला आपले विचार आकाराला येण्यासाठी किंवा पुनर्तपासणीसाठी हे पुस्तक उपयोगी ठरणारे आहे हे निश्चित. माणसाच्या समस्यांवर, मर्यादांवर बोट ठेवून चिकित्सक व विश्लेषणात्मक लेखन करणाऱ्या या लेखकाला आपले हे लेख लवकरात लवकर 'अप्रस्तुत' ठरावेत, असंच वाटत असणार...!