1)२१ ग्रेट लीडर्स..... (विश्वावर ठसा उमटवणाऱ्या नेतृत्वांची कार्यशैली) या पुस्तकात 21 नेत्यांची चरित्रे दिली आहेत. यापैकी प्रत्येक जण नेतृत्वाच्या 7 पैलूंपैकी एखाद्या विशिष्ठ गुणांनी युक्त असे आहेत. 2)असे घडवा तुमचे भविष्य...... ( विचारांना नवी दिशा देणारं प्रेरणादायी पुस्तक) २००२ पासून २००७ पर्यंत डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी भारताचं राष्ट्रपतीपद भूषवलं. राष्ट्रपती पदावर असताना ते जितके लोकप्रिय होते तितकेच आजही आहेत. 3)कमला हॅरिस. (भारतात सुरू झालेली अमेरिकन कथा.........) देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं होणार होतं की एक कृष्णवर्णीय-आशियायी महिला जगातील सर्वात शक्तिशाली सभागृहामध्ये महत्त्वपूर्ण पदासाठी उमेदवार म्हणून घोषित झाली होती. 4) माय लाईफ इन फुल (माझं परिपूर्ण आयुष्य) मी युनायटेड स्टेटसचे अध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान यांच्या मधोमध उभी होते. बराक ओबामा आणि मनमोहन सिंग यांनी आमच्या गटचर्चेचा आढावा घेण्यासाठी प्रवेश केला.
Share
Choosing a selection results in a full page refresh.