वाचू आनंदे - बाल गट - (भाग एक व दोन) संपादन:माधुरी पुरंदरे, संपादन साहाय्य : नंदिता वागळे Vachu Anande Madhure Purandare
वाचू आनंदे भाग १ ISBN 81-7925-036-9
वाचू आनंदे भाग २ ISBN 81-7925-037-7
मुलांना चांगलं साहित्य वाचण्याची गोडी लागावी आणि त्याबरोबरच शाळेमध्ये असलेल्या विविध विषयांचं आकलन सहज सोप्या पद्धतीने व्हावं या दृष्टिकोनातून या पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. बाल आणि कुमार गटातल्या मुलांच्या आकलनशक्तीनुसार त्यांच्यासाठी प्रत्येकी दोन पुस्तकं या संचात आहेत. या चारही पुस्तकांत मराठीतल्या दर्जेदार साहित्याबरोबरच ख्यातनाम चित्रकारांच्या प्रसिद्ध चित्रकृतींचा अंतर्भावही करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाचनानंदाबरोबरच चित्रानंदाचाही अनुभव मिळतो. शब्द या माध्यमाबरोबरच दृश्य माध्यम पाहण्याची मुलांना सवय लागून त्यांच्या जाणिवा व संवेदना अधिक प्रगल्भ होण्यात मदत होते.