Payal Books
महिलांच्या सत्तासंघर्षाचा आलेख BY Vaishali Pawar
Couldn't load pickup availability
१९६० ते २००९ पर्यंतच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमधील महिलांच्या राजकीय सहभागाचे विश्लेषण ‘महिलांच्या सत्तासंघर्षाचा आलेख’ या पुस्तकात केले आहे.
राजकीय समावेशन (Political Inclusion), राजकीय वगळण्याची प्रक्रिया (Political Exclusion), लिंगभाव व पितृसत्ताकता (Gender and Patriarchy) या संकल्पनात्मक चौकटींमध्ये महिलांच्या राजकीय सहभागाचे चिकित्सक विश्लेषण या ठिकाणी केलेले आहे.
हे पुस्तक समावेशन व वगळण्याची प्रक्रिया धोरणनिर्मिती विभाग (Political Inclusion and Exclusion Department), स्त्री अभ्यास केंद्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र विभाग यांना उपयुक्त ठरणारे आहे.
‘महिला सक्षमीकरण धोरण’ हे आधुनिक उदारमतवादाचा विकास व विस्तार करणारे धोरण कसे आहे याचेही सविस्तर विवेचन या पुस्तकाद्वारे केले गेले आहे.
रमाबाई रानडे व शारदाबाई पवार यांनी कौटुंबिक चौकट मोडीत न काढता सार्वजनिक व व्यक्तिगत जीवनामध्ये उदारमतवादाचा वापर कसा केला, याचे स्पष्टीकरण येथे केले आहे.
त्याचप्रमाणे स्थानिक व राज्य पातळीवरील सत्तेमध्ये महिलांना किती प्रमाणात वाटा मिळाला याचेही संख्याशास्त्रीय माहितीच्या आधारे अभ्यासपूर्वक विश्लेषण केलेले आहे
