Payal Book
मराठीतील सत्य, शिव आणि विचारधारा marathil satya shivaani vichardhara by डॉ. शशिकांत लोखंडे shashikant lokhande
Regular price
Rs. 4.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 4.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मुळात ‘सत्यं शिवं सुंदरम्’ ही त्रैक्यसंकल्पना भारतीय नाही. ती अभारतीय आहे. तिची बीजे/मुले ग्रीक संस्कृतीतील विचारांत आहेत. पायथॅॅगोरस, सॉंक्रेटीस, प्लेटो, अँँरिस्टॉटल ह्यांनी ही मुल्यसंकल्पना प्रसारित केली. तिचा भारतीय तत्त्वज्ञानातील ‘सत् चिद् आनंद’शी काहीएक संबंध नाही . वेद, उपनिषदे, आरण्यके, आर्ष महाकाव्य ह्यांत कुठेही ही संकल्पना नाही. किमान त्रैक्यरुपात तरी कुठेही नाही.
मूळ प्रबंध ‘सत्य सुंदर मंगल’ असा आहे. त्याचे भाषांतर ज्योतिरिन्द्रनाथांनी ‘सत्यंं शिवं सुंदरम्’ असे केले. त्यांनी सत्यचे ‘सत्यम्’ , शिवचे ‘शिवम्’ व सुंदरचे ‘सुंदरम्’ असे रूप केले. महर्षी देवेंन्द्रनाथांनी ब्राम्होसमाजाच्या प्रार्थनेत त्याचा समावेश केला. पुढे तेथून मराठीत वा. गो. आपटे ह्यांनी ह्या संकल्पनेला मराठी साहित्यविचारात मानाचे स्थान दिले.
