प्रिय डोरोथी | Priy Dorothi By Sujata Godbole
'डोरोथी नॉर्मन... लोकशाहीबद्दल आस्था बाळगणारी एक अमेरिकन तरुणी. इंदिरा गांधी... जवाहरलाल नेहरूंची लाडकी कन्या. ऑक्टोबर १९४९ मध्ये दोघींची अमेरिकेत पहिली भेट झाली आणि सुरू झाला दोघींमधला पत्रव्यवहार. त्या एकमेकींच्या व्यथावेदना पत्रांतून जाणून घेत, परस्परांना रोखठोक सल्लेही देत. फार मोठा भावनिक आधार वाटे एकमेकींना! इंदिराजींच्या दु:खद निधनानंतर तो पत्रव्यवहार थांबला. डोरोथी नॉर्मन यांनी आपल्याजवळ जपून ठेवलेल्या निवडक पत्रांचा एक संग्रह १९८५ साली आपल्या जिवलग मैत्रिणीला श्रद्धांजली म्हणून प्रसिद्ध केला. त्या जुन्या, गाजलेल्या दुर्मीळ पत्रसंग्रहाचा हा अनुवाद... इंदिराजींच्या व्यक्तिमत्त्वाच्या एका हळव्या पैलूवर टाकलेला प्रकाश! '