Skip to product information
1 of 2

Payal Books

देवनारचा डोंगर आणि फर्झाना - सौम्या रॉय, अनुवादित छाया दातार Deonarcha dongar aani farzana - saumya roy , translated by Chhaya Datar

Regular price Rs. 268.00
Regular price Rs. 290.00 Sale price Rs. 268.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications
एका बाजूला चंगळवादात बुडालेला झगमगता श्रीमंती थाट जोपासणारं एक जग
आणि दुसऱ्या बाजूला उपभोगाला प्राधान्य देणाऱ्या वापरा आणि फेका संस्कृतीतून
निर्माण होणाऱ्या कचऱ्यालाच उपजीविकेचं साधन बनवणाऱ्यांचं एक बकाल जग.
मुंबईसारख्या शहरांचं हे दुभंगलेपण आपल्याला अनेकदा पाहायला मिळतं. परंतु
यातल्या बकाल जगातील माणसांचं जगणं तितकंसं जवळून पाहायला मिळत नाही.
देवनारचा कचरा डेपो आणि त्यावर जगणाऱ्या माणसांमध्ये तब्बल दहा वर्षे काम
करून अनुभवलेलं एक दुर्लक्षित जग पत्रकार असलेल्या सौम्या रॉय यांनी
आपल्यासमोर उलगडलं आहे.
शहराच्या बकालीकरणात भर घालणारा, मानवी आरोग्य धोक्यात आणणारा हा
कचरा डेपो बंद करावा म्हणून सुरू असलेली न्यायालयीन लढाई आणि त्याचवेळी
20 मजल्यांची उंची गाठलेल्या कचऱ्याच्या डोंगरावर शहरातली जमा केलेली घाण
घेऊन येणाऱ्या ट्रक्सच्या मागे धावणाऱ्या कचरावेचकांचा सुरू असलेला
जगण्यासाठीचा संघर्ष यातल्या विरोधाभासाचं चित्रण आपल्याला या पुस्तकात
अनुभवायला मिळतं.

‌‘माउंटन टेल्स" या इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद वाचकांना अस्वस्थ तर करेलच
परंतु मानवानेच निर्माण केलेल्या प्रश्नांकडे बघण्याची नवी दृष्टीही देईल.