Payal Books
साहस कथा संच Sahas Katha Sanch
Couldn't load pickup availability
१. साहसी मुले
मोठ्या माणसांप्रमाणेच मुलंदेखील उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करतात, त्यामुळे गुप्तहेरही होऊ शकतात. रमा, चेडो आणि चिंटू या लहान गुप्तहेरांच्या या पुस्तकातल्या गोष्टी मुलांना नक्कीच आवडतील.
२. अदितीची साहसी सफर
धैर्याची तलवार अदृश्य करणारा अंगरखा आणि एक जादूचा चिकणमातीचा गोळा घेऊन चौघी मैत्रिणी - अदिती, मुंगी, हत्तीण आणि माकडीण ड्रॅगनच्या देशात जातात... त्या महाभयानक अजस्र प्राण्याला हुडकून काढणं त्यांच्या राज्यासाठी आवश्यक असतं... या चौघींच्या धाडसाची ही गोष्ट.
३. साहस कथा
गीरच्या जंगलात, मुले पळवणारा प्राणी अशा चित्तथरारक कथांचा संग्रह.
४. चिन्ना
चिन्ना हा खोडकर आणि आदिवासी मुलगा निसर्गावर प्रेम करत साधं आयुष्य व्यतित करत असतो. चोरटे शिकारी, लाकूड तोडणारे चोर, अगदी माणसाच्या जीवावर उठणारा नरभक्षक वाघ यांवरही आपल्या चलाख बुद्धीने मात करतो. सुप्रसिद्ध चित्रकार पुण्डलीक वझे यांच्या चित्रांनी नटलेली ही बालकादंबरिका.
