Skip to product information
1 of 2

Payal Books

मुलांचे शिक्षण : पालक व शासन by Ramesh Panse

Regular price Rs. 178.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 178.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications
शिक्षणाविषयी सार्वत्रिक समाधान तर आहेच. किंबहुना म्हणूनच ते नाकारण्याचा आणि त्याच्या जागी पर्यायी शिक्षण उभे करण्याचा परिवर्तनवादी विचार आता होऊ लागला आहे. पण, हा एकच प्रश्‍न नाही. आणखिही काही मोठे प्रश्‍न आहेत. उदाहरणार्थ, शिक्षण सर्वांनाच मिळत नाही. शिक्षणाची संधी आजही अनेक सामाजिक आर्थिक आणि राजकीय कारणामुळे सर्वांना सामावून घेत नाही. शिक्षणवंचितांचा मोठा वर्ग असणारा असा आपला देश आहे. ज्यांना शिक्षणाची संधी मिळते त्यांना ता समानतेने मिळत नाही, हे घटनेच्या जाहिरनाम्यात समतेचा उद्घोष करणार्‍या राष्टा्रतील सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. एके काळी सामाजिक वर्गवारीनुसार शिक्षणाची संधी असायची तर आता प्रामुख्याने आर्थिक वर्गवारीनुसार. शिक्षण ही एक विक्रेय वस्तू म्हणूणच ठरविली गेली, आणि सरकारी शिक्षण खात्याचे रूपांतर मानवी संसाधन खात्यात केले गेले, त्यामुळे शिक्षणाचा प्रत्यक्ष संबंध ग्राहकाच्या खरेदीशक्तीशी बांधला गेला. बाजार हा नेहमीच असमता निर्माण करतो, हे आपण याबाबतीत ध्यानात घ्यायला हवे. संधीची व दर्जाची समानता हे आजुनही क्षितीजाच्या पलिकडचे ध्येय आहे.
आपले आजचे शिक्षण असमाधानकारक आहे, असे वेगवेगळ्या कारणाने पण प्रत्येकजणच म्हणत असतो. शिकतांना शिकणार्‍यांना त्यात रस वाटत नाही, असा अनुभव सार्वत्रीक आहे. शिक्षणाने व्यक्तीला आयुष्यभरासाठीची ज्ञान, मुल्ये, कौशल्य आणि प्रश्‍न सोडविण्याची ताकद द्यायची असते. आजचे शिक्षण हे असे नाही, अशी भावना जर सार्वत्रिक असेल तर सार्वत्रिकरित्याच ते नाकारले गेले पाहिजे. त्यासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडले गेले पाहिजे