Payal Books
प्राकृतिक भूगोल आणि भूरूपशास्त्र by SHRIKANT KARLEKAR
Couldn't load pickup availability
प्राकृतिक भूगोल आणि भूरूपशास्त्र हे पुस्तक, या विषयांचा अभ्यास करणार्यांसाठी एक उपयुक्त संदर्भग्रंथ होईल अशा उद्देश्याने लिहिण्यात आलेले आहे. यात सूर्यमाला व पृथ्वी, आकाशगंगा, तिच्या निर्मितीचे सिद्धान्त, पृथ्वीचा चंद्र याबरोबरच कालमापनाच्या पद्धती आणि अक्षवृत्ते, रेखावृत्ते यांसारखी पृथ्वीबद्दलच्या मूलभूत संकल्पनांची माहितीही देण्यात आली आहे. पृथ्वीवरील सर्व क्रिया-प्रक्रिया आणि त्यातून निर्माण होणारी भूरूपे, हिमालयाची निर्मिती, उतार आणि उतारांच्या उत्क्रांतीचे सिद्धान्त या विषयांचा समावेशही केलेला आहे. त्यामुळे अभ्यासकांना हा संदर्भग्रंथ निश्चितच उपयुक्त ठरेल.
वैशिष्ट्ये :
* यु.जी.सी. (ugc ) अभ्यासक्रमावर आधारित
* संकल्पना स्पष्ट करणार्या अनेक आकृत्या
* प्रत्येक प्रकरणानंतर स्वाध्याय प्रश्नसंच
* पारिभाषिक शब्दसूची
