Payal Books
नक्षलवादाचे आव्हान दंडकारण्यातील अस्वस्थ वर्तमान देवेंद्र गावंडे | Nakshalwadache Aavhan
Couldn't load pickup availability
नक्षलवाद्यांची हिंसापूर्ण चळवळ व सशस्त्र लढ्याची तयारी, अतिमागास आदिवासी प्रदेशांत त्यांना मिळणारे पाठबळ, राज्य सरकारे आणि भारत सरकार यांच्याकडून सतत दिले जाणारे गोंधळाचे संकेत आणि पोलिसी बळावर दिला जाणारा भर या सगळ्या कारणांमुळे नक्षलवादाच्या प्रश्नाबद्दल, उद्दिष्टांबद्दल कार्यपद्धतीबद्दल आणि परिणामांबद्दल जिज्ञासू व जागरूक नागरिकांना माहिती व दृष्टी उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. पण वाचक-प्रेक्षकांचे क्षणिक लक्ष वेधून घेण्याच्या माध्यमसंस्कृतीच्या काळात नक्षलवादाबद्दल सनसनाटीच्या पलीकडे लोकांच्या हाती फारसे काही लागत नाही. या पार्श्वभूमीवर, नक्षलवादाचे आव्हान नेमके काय आहे, याची चर्चा करणारे हे पुस्तक वाचकांना नक्कीच विचारप्रवृत्त करणारे ठरेल!
