Payal Books
तीन मुलांचे चार दिवस | Tin Mulanche Char Divas
Couldn't load pickup availability
डिसेंबर २०१५ मध्ये, पुणे शहरात राहणारी तीन मुले (आदर्श पाटील, विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळे) 'माणूस' समजून घेण्यासाठी भामरागडच्या पलीकडे,
छत्तीसगडच्या परिसरातील दंडकारण्यात आदिवासींच्या प्रदेशात- सायकल प्रवास करीत गेले. मित्रांनी, ज्येष्ठांनी, कार्यकर्त्यांनी, पोलिसांनीही 'तो डेंजर झोन आहे' असे सांगितले असूनही हे तिघे गेले....
आणि नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या आदिवासी गावांत/पाड्यांवर त्यांना
थांबवून ठेवण्यात आले. चार दिवसांनंतर (पोलिसांचे खबरे नाहीत अशी खात्री पटल्यावर), त्यांना सोडून देण्यात आले.
तोपर्यंत 'तीन तरुणांचे अपहरण झाल्याच्या बातम्या' महाराष्ट्रात झळकल्या... आणि त्यांच्या सुटकेसाठी सरकारी पातळीवर प्रयत्न जारी करण्यात आले. त्या तीन तरुणांची 'त्या' चार दिवसांची डायरी, त्या सफरीचे मागचे पुढचे संदर्भ, प्रांजळ आत्मनिवेदन आणि धना भरपूर रंगीत छायाचित्रांचा समावेश असलेले, आदिवासींच्या काशन जीवनात डोकावणारे अत्यंत वाचनीय पुस्तक.
