टागोरांच्या गोष्टी आणि इतर गोष्टी संच Tagorchaya Gosti Ani Etar Gosti Sanch
१. टागोरांच्या गोष्टी
काबुलीवाला, पुनरागमन, सुट्टी, पोस्टमास्तर, सुभा, मास्तरमहाशय, नवीन बाहुली अशा प्रसिद्ध नऊ कथानकांचा या पुस्तकात समावेश केला आहे. पद्मिनी बिनीवाले यांनी केलेल्या सरळ सोप्या रूपांतरामुळे मुलांना रवींद्रनाथांची ओळख होईल व त्यांच्या साहित्याची गोडी लागेल. यातूनच त्यांना अभिजात साहित्याविषयी ओढ निर्माण होईल. मुलांसोबत पालकांनाही या गोष्टी वाचता येतील.
२. चन्द्रपहाड
विभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या प्रसिद्ध साहसकथेचा मराठी अनुवाद.
शंकर हा बंगालमधला एक सामान्य घरातला मुलगा. शालेय शिक्षण संपवून घरी आलेला असताना घराची आर्थिक ओढाताण पाहून त्याला पुढच्या शिक्षणाचा विचार सोडवा लागतो. पण तागाच्या मिलमधली सामान्य नोकरी त्याला करायची नसते.
त्याचा आवडता विषय असतो भूगोल आणि त्याच्या तरुण मनाला साहस भुरळ घालत असते. अचानक अशी एक संधी त्याच्यापुढे चालून येते, आणि सुरू होतो त्याचा अद्भुत आणि विस्मयकारक प्रवास...
३. वामाचा खजिना
विभूतीभूषण बंदोपाध्याय हे भारतीय साहित्यातील अजरामर नाव. त्यांचे नाव घेतले की आठवतो तो 'पथेर पांचाली' हा गाजलेला चित्रपट. परंतु त्यांनी बंगालीत विपुल लेखन केले आहे. त्यांच्या साहित्याची इंग्रजीसह देशातील अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत. त्यांनी १९ कादंबऱ्या आणि अनेक कथा लिहिल्या आहेत. त्यातल्याच काही कथांचे या पुस्तकात संकलन केले आहे. या पुस्तकातल्या मसाला भूत, कशी वैद्यांची गोष्ट, पदक अशा अद्भुताने भारलेल्या, तर तांदूळ, ताडनवमी, म्हातारा लाकूडतोड्या अशा करूण रसाने भरलेल्या अकरा कथा मुलांना नक्कीच आवडतील.
४. हॅनाची सूटकेस
टोकियोतील हॉलोकॉस्ट एज्युकेशन सेंटर या मुलांसाठी चालवल्या जाणार्या केंद्रावर २००० सालच्या मार्च महिन्यात एक सूटकेस येऊन पोहोचली. त्यावर पांढर्या रंगात लिहिलेलं होतं. 'हॅना ब्रँडी, १६ मे १९३१ - अनाथ'. ही सूटकेस पाहून मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले, ही हॅना कोण?... तिचं काय झालं?...
तिच्या शोधाचीच ही यशस्वी पण दुःखद कहाणी!
विक्रमी खपाचं 40 भाषांमध्ये पोहोचलेलं पुस्तक.