Payal Books
जवाहरलाल नेहरू--सुरेश द्वादशीवार jawaharlal neharu
Couldn't load pickup availability
जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी स्वातंत्र्य हा जुन्या मार्गाचा शेवट नव्हता, नव्या वाटेचा आरंभ होता. त्याआधीचा त्यांचा व देशाचा प्रवास एका प्रदीर्घ व अंधाऱ्या वाटेवरील कष्टाचा, वेदनांचा व विजयाचा होता. स्वातंत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते, ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते.
आयुष्याची २७ वर्षे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या धकाधकीत, तर त्यातली १० वर्षे तुरुंगात (एकूण सात वेळा मिळून) काढली होती. ते डिसेंबर १९२१ मध्ये प्रथम तुरुंगात गेले. त्यांचा अखेरचा तुरुंगवास ९ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झाला, तो १०४१ दिवसांचा होता.
अखेरच्या कारावासानंतर दोन वर्षांनी ते देशाचे पंतप्रधान झाले आणि १६ वर्षे त्या पदावर राहिले. त्या काळात त्यांनी देशाच्या आधुनिकतेची, लोकशाही वाटचालीची व सर्वक्षेत्रिय प्रगतीची पायाभरणी केली. अशा या नेत्याचे चरित्र समजून घेतले पाहिजे, कारण एका मर्यादित अर्थाने ते देशाचेही चरित्र असते.
