Payal Books
ग्रामीण मातंग स्त्री : एक समाजशास्त्रीय अभ्यास by Ramchndra Bhise
Regular price
Rs. 404.00
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 404.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
भारतीय समाजरचनेचा अभ्यास केल्यास असेच लक्षात येते की, जातिभेदाबरोबरच पुरुष प्रधानता व लिंगभेद यालाही तेवढेच महत्त्व दिलेले आहे. स्त्रियांच्या भूमिका व दर्जा याबद्दल जेव्हा विचार केला जातो, तेव्हा लक्षात आले की, पुरुषप्रधानता, जातिभेद, लिंगभेद या तिहेरी शोषणाची ‘ती’ बळी आहे.
अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट असलेल्या ५९ जातींची ओळख अस्पृश्य व दलित जाती म्हणून आहे. या जातींमध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागात वास्तव्य करणार्या महार, मातंग, चांभार या जाती लोकसंख्येने अधिक आहेत. अनुसूचित जातीतील कनिष्ठ व वंचित जात म्हणून मातंग जातीबद्दल काही अभ्यास व संशोधन झालेले आहे; परंतु, मातंग स्त्रियांचा दर्जा व भूमिका, प्रश्न व समस्या याबद्दलची फारशी मांडणी संशोधनातून व अभ्यासातून झालेली नाही. मातंग स्त्री ही स्वतंत्र लिखाण व अभ्यासापासून वंचित होती; त्यामुळेच संशोधक म्हणून दलित मातंग स्त्रियांबद्दल स्वतंत्र संशोधन करून, ती तिहेरी शोषणास कशी बळी पडते. तिचे प्रश्न व समस्या इतर स्त्रियांपेक्षा वेगळ्या आहेत. याकडे स्त्री चळवळीने, दलित चळवळीने, स्त्री अभ्यासकांनी कसे दुर्लक्ष केले. या व इतर बाबींचा आढावा या संदर्भग्रंथातून घेतला आहे