Payal Books
गणित संज्ञाकोश – भाग १ अंकगणित आणि बीजगणित नि.प्र.शिंपी, अ.तु.मावळंकर, हे.चि.प्रधान Ganit Sandhyakosh Part 1
Couldn't load pickup availability
१०वी पर्यंतच्या प्रत्येक मुलाजवळ हवा असा गणितातील संज्ञांचा अर्थ सांगणारा कोश.
अनेक वेळा आपल्याला अडणाऱ्या संज्ञांचा अर्थ एकतर आधीच्या वर्षांच्या पुस्तकांत असतो, नाहीतर चालू वर्षीच्या पुस्तकात असला तरी कोठे आहे ते नेमके माहीत नसते. हा अर्थ पाहिजे तेव्हा लगेच मिळाला नाही तर अडचण येते, आणि पुढचा अभ्यास कठीण होतो. या पुस्तकात इ. ५ वी ते ७ वीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातील अंकगणित आणि बीजगणितातील जवळजवळ सर्व संज्ञा एकत्रित केल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे येथे संज्ञांचे नुसते शाब्दिक अर्थच सांगितलेले नाहीत तर त्या संज्ञेमागची कल्पना स्पष्ट केली आहे. संज्ञांचा अर्थ व्यवस्थित कळल्यामुळे गणिताच्या पुढील अभ्यासात या संज्ञा अधिक सहजपणे आणि आत्मविश्वासाने वापरता येतील.
