Payal Books
खंडाळ्याच्या घाटासाठी (संक्षिप्त आवृत्ती) शुभदा गोगटे (संक्षिप्तीकरण : चंचल काळे) Khandalyachya adahatil Chachal Kale
Couldn't load pickup availability
या कादंबरीचे संक्षिप्तीकरण करताना त्यातील नायकाच्या अनुषंगाने येणारी कौटुंबिक आणि तांत्रिक माहिती ठेवून ते करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे, जेणेकरून या कादंबरीच्या लेखिका शुभदा गोगटे यांचा उद्देश सफल व्हावा.
या कादंबरीत सह्याद्रीच्या कुशीत मानवाने अथक परिश्रम करून निर्माण केलेल्या खंडाळा घाटाच्या निर्मितीची सुरुवातीपासून ते पूर्णत्वापर्यंतची रोचक माहिती शुभदाताईंनी ‘नारायण’ या नायकाच्या माध्यमातून करून दिली आहे. नारायण, म्हणजे कादंबरीच्या नायकाच्या जडणघडणीसोबतच खंडाळ्याच्या घाटाची जडणघडणही या कादंबरीत वाचायला मिळेल. कोकणातल्या एका खेड्यातून मुंबईसारख्या मोठ्या शहरात आलेला नारायण, त्यावेळी नव्याने सुरू झालेल्या आगगाडीच्या प्रेमात पडतो. त्याच दरम्यान खंडाळ्याच्या घाटाच्या निर्मितीचे काम इंग्रज सरकार सुरू करते. नारायण तिथेच काम करायचा ध्यास घेतो. घरातील विरोधाला न जुमानता तो या घाटाच्या निर्मितीच्या कामात झोकून देतो. तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या नारारणला दरम्यान खूप वेगवेगळे अनुभव येतात. नारायणचे जंगलातील वास्तव्य आणि घाट निर्मितीचा ध्यास घेऊन काम करणारे सर्वच जण.
एक प्रकारे माणूस आणि निसर्ग यांच्या दरम्यानच्या संघर्षाचे वर्णनच या कादंबरीत आहे. कादंबरीतील कथानकासोबतच या घाटाच्या कामाच्या वेळी इंग्रजांनी केलेल्या ऐतिहासिक नोंदींचा अभ्यास, संशोधन करून त्यातील तांत्रिक माहितीसुद्धा लेखिकेने करून दिली आहे. त्यामुळे रंजनाबरोबरच घाटाच्या निर्मितीचा इतिहास, आलेल्या अडचणी, तत्कालीन कौटुंबिक, सामाजिक वातावरण यांचीही माहिती वाचकांना कळेल.
