Payal Books
कोऽहम --सुरेश द्वादशीवारKoham
Couldn't load pickup availability
सॉक्रेटिस, प्लेटो आणि ॲरिस्टॉटल या गुरू-शिष्यांच्या परंपरेने ग्रीक तत्त्वज्ञानाचा पाया घातला.
जगभरचे तत्त्वचिंतन या परंपरेला वंदन करीत आले.
त्यापैकी प्लेटोने त्याचे तत्त्वज्ञान दोन भिन्न शैलींत मांडले.
पहिली सूत्रबद्ध आणि ग्रांथिक, तर दुसरी नाटकाच्या रोचक रूपातली. पहिली रचना अभ्यासकांसाठी, तर दुसरी सर्वसाधारण वाचकांसाठी. काळाचा महिमा असा की, त्याच्या अकादमीला लागलेल्या आगीत त्याची सूत्रबद्ध रचना जळून नाहीशी झाली. लोकांच्या भाषेत लिहिलेले त्याचे चिंतनच तेवढे पुढे टिकले.
त्याच चिंतनाने तत्त्वज्ञ म्हणून प्लेटोला अजरामर केले. ज्ञान हा शैलीने बाधित न होणारा जनसामान्यांचा हक्क आहे, हा या घटनेचा अर्थ...
'कोऽहम' ही कादंबरी त्या दिशेने प्रवास करणारी...
