Skip to product information
1 of 2

Payal Books

इंधन (संक्षिप्त आवृत्ती) हमीद उमर दलवाई (संक्षिप्तीकरण : नंदा सुर्वे) Endhan Hamid Umar Dalvai

Regular price Rs. 90.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 90.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

जवळपास पंधरा वर्षांनी आपल्या कोकणातल्या वतनाकडे आलेला हा प्रवासी म्हणजे स्वतः लेखकच आहे. त्याला आलेल्या हार्टअ‍ॅटॅकनंतर हवापालटासाठी आणि ताणरहित जगण्यासाठी तो इथे आला आहे.

लेखक पुरोगामी विचारांचा, मुस्लीम आहे. त्याने सारी धार्मिक कवचं झुगारून दिलेली आहेत. त्यासाठी त्यांना आपली वतनवाडी सोडून मुंबईसारख्या महानगरात दाखल व्हावे लागले. कारण अरूंद परिघात सनातन्यांच्या ळ्या पाडणे केवळ अवघडच नव्हे तर अशक्य झाले असते. त्यासाठी आपल्या कुटुंबापासून दूर जावे लागल्याचा सल त्यांच्या मनात आहे. तो अनेक घटना, प्रसंगातून प्रतीत होत राहातो.

सुरुवातीच्या काळात तो गावातल्या घटनांकडे तटस्थपणे पाहतो. पण जसजशी गावातल्या राजकारणात तीव्रता यायला लागते, राजकारण टोकदारपणाकडे सरकू लागते, तसतसा त्याच्यातला मानव जागा होतो आणि त्याच्याल्या पुढारीपणाला नकळत साद घालू लागतो. गावातले गुंते, विद्रोह, जटिलता सोडवण्यासाठी त्याचा सल्ला मागितला जातो. तो नेहेमी समझोत्याचा सल्ला देतो. पण तो कोणाला रूचत नाही. कारण प्रत्येकाचा अहंकार आड येतो.

एकेकाळी दिलजमाईने वागणाऱ्या हिंदु-मुस्लीमांमध्ये मतांतराच्या ठिणग्या पडू लागतात. त्यामुळे लेखकाचे संवेदनशील मन अनेकदा विषण्ण होत राहते. गावातले जे धार्मिक संकेत होते त्यांना तडे जाला लागलेले दिसतात. लेखकाच्या विचारसरणीनुसार माणूस केंद्रवर्ती राहाला हवा. पण इथे त्यांना धर्म, जातीपाती केंद्रस्थानी होत जाताना दिसतात.

एकूणच ‘इंधन’मध्ये हिंदु-मुस्लीम संघर्ष उभा केला आहे. कुळवाडी, कुणबी, बौद्ध असा तळागाळातला समाज पेटून उठतो. गावातल्या परंपरेला छेद देण्यापर्यं त्यांची मजल जाते. गावात शांतता नांदवण्यात लेखक असमर्थ ठरतो. अखेरीस काळच काही परिवर्तन करू शकेल असा सुजाण विचार करून तो परतीच्या प्रवासाला निघतो.